Skip to main content

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी, चांडोली, तळेघर येथे पेट्रोल पंप चालू होणार

मंचर प्रतिनिधी:




मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसातच लोणी, चांडोली, तळेघर येथे पेट्रोल पंप चालू करण्याचे नियोजित आहे, तर चांडोली येथे एक हजार मेट्रिक टनचे गोडाऊन व शेतकऱ्यांसाठी शीतगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

लोणी ता. आंबेगाव येथील उपबाजारात विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी देवदत्त निकम बोलत होते, यावेळेस माजी आमदार पोपटराव गावडे,कात्रज दुध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,प्रकाश पवार,दादाभाऊ पोखरकर,शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर,आर.आर. वाळुंज,गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड,रामदास जाधव,अशोक आदक, उदय डोके बाजार समितीचे सर्व संचालक व सचिन बोऱ्हाडे, कर्मचारी उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले लोणी उपबाजारात शिरूर तालुक्यातील काही भाग तसेच नागापूर, रांजणी, वळती,निरगुडसर, अवसरी, पारगाव, शिंगवे, लोणी,धामणी,खडकवाडी, पोंदेवाडी, वाळुजनगर,वडगावपीर, पहाडदरा या परिसरातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते त्यासाठी ६०×३०० फुटाचे कांदा लिलाव शेड उभारण्यात येणार आहे, मागील वर्षी या उपबाजारात सुमारे साडेतेरा कोटीची कांदा विक्री झाली आहे. येत्या काही दिवसात 60 टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, या उप बाजारात कांदा या शेतमालावर कोणताही कडता घेतला जात नाही, शेतकऱ्यांना कांदा लिलाव आनंतर 48 तासात मालाचे पेमेंट केले जाते सर्व लिलाव हे बाजार समिती मार्फत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो,असे निकम यांनी सांगितले.

विवेक वळसे पाटील म्हणाले की लोणी हे गाव पूर्वी मोठी बाजारपेठ म्हणून समजली जात होती सध्या पूर्वीसारखी बाजारपेठ राहिली नसून सध्या लोणी उपबाजार च्या निमित्ताने या परिसरात अनेक सोयी निर्माण होत आहेत, त्यामुळे या परिसराचा विकास होण्यास नक्कीच फायदा होईल आर्थिक स्तर उंचावेल असे वळसे-पाटील म्हणाले.

पोपटराव गावडे म्हणाले बाजार समितीत काम करताना शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होणार नाही असे निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल असे गावडे म्हणाले.

यावेळेस लोणी गावचे सरपंच उर्मिला धुमाळ विक्रेते महेंद्र वाळुंज,प्रकाश बापू पवार,विष्णू काका हिंगे यांनी आपले मनोगत मांडले.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...