Skip to main content

मोदींचा खेळ देशाला परवडणारा नाही.

 


मोदींचा खेळ होईल व सर्व भारतीय लोकांना त्रास होईल. 



आपला इव्हेंट चा सोस देशातली आरोग्य व्यवस्था मोडून काढू शकतो.


जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर विजेची मागणी एकदम कमी होऊन जाईल. आधीच लॉक डाऊन मुळे मागणी कमी झाल्यामुळे मागणी पुरवठा आणि निर्मिती चे गणित बिघडले आहे.


जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर (जर वापर असेल तरच वीज निर्माण करता येते, वापरच नसेल तर बनवलेली वीज कुठे ठेवता येत नाही ) अजून परिस्थिती बिघडून जाईल व स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाई फ्रिक्वेन्सी वर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  


या इव्हेंट चा फेरविचार व्हावा असे मत अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत.


महाराष्ट्राची विजेची मागणी २३००० MW वरून १३००० घटलेली आहे आणि ही १३००० MW वीज फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरघुती विजेचा लोड आहे. 


जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड  फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सी वर ट्रिप होतील.संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्र सारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअर मूळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टि स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील, आयसीयूमध्ये माणस मरतील कारण सगळीकडे बॅकअप असेलच असे नाही. जनरेटर चालवले तरी त्याला मर्यादा आहेत, डिझेल पुरवठा व्हायला हवा कारण हा डाऊन टाइम प्रचंड मोठा आहे.


डाऊन टाईम नेमका किती याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नेमकी परिस्थिती स्पष्ट केली आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा



एक पॉवर स्टेशन सर्विस मध्ये यायला साधारण १६ तास लागतात या प्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला एक आठवडा जाईल.


आपला इव्हेंट चा सोस आपल्याच दवाखान्यात असलेल्या माणसांच्या जीवावर उठू शकतो.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...