आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्हा,नगर ,येथील हिंदू-मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब देवाची यात्रा (ऊरुस) मंगळवार दि. १७ ते गुरुवार दि. १९ असा तीन दिवस भरणार होती. पण यात्रेसाठी बाहेरून आलेल्या भाविकांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन त्याचा फैलाव होऊ नये म्हणून वडगावपीर व मांदळेवाडी ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरस चे रुग्ण देशात अनेक ठिकाणी आढळून आले असून पुण्यातही कोरोनाचे ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अतिदक्षता म्हणून अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून त्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी आंबेगाव तालुक्यात वडगाव पीर येथे होणारा पिराचा उरूस (यात्रा) रद्द करण्यात आली आहे. आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावच्या ग्रामस्थांची बैठक वडगावपीर येथे शुक्रवार दिः.१३ रोजी आयोजित केली होती. यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, वडगावपीरच्या सरपंच मिरा पोखरकर, मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक,हजरत दावल मलिक पीरदर्गा शरीफ ट्रस्टचे अध्यक्ष हनिफभाई मुजावर, उपसरपंच रविंद्र गुळवे, जायदाबी मुजावर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सावळेराम आदक, शांताराम सुर्यवंशी, पोपट राजगुडे, सचिन आदक, संतोष आदक, लिलाधर आदक, बापू आदक,ग्रामसेविका मनिषा काळे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी व बाहेरील भाविक भक्तांनी यात्रा रद्द झाल्यामूळे यात्रेसाठी येऊ नये असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...