Skip to main content

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

प्रमोद दांगट : प्रतिनिधी



शाळेतील आठवणींना उजाळा देत जीवन शिक्षण मंदिर वाफगाव व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सन 2004 इयत्ता 4 थी व सन 2000 इयत्ता 10 वी मधील शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्यात सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि त्यांना व एकमेकांना भेटण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.



सर्व शिक्षकांची गावातील मुख्य चौकातून ढोल ताशाच्या गजरात  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वांचे औक्षण, परिपाठ व स्वागतगीताने कार्यक्रमला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना हिरामण वाघोले यांनी विद्यार्थी शिक्षक मेळाव्याची गरज असून हा मेळावा आमच्या आयुष्यास नवसंजीवनी देणारा आहे. हा दिमाखदार सोहळा कायम स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त केले. नानासाहेब शेवाळे यांनी शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी या केले. असे सांगितले.



त्यावेळचे 10 वी चे वर्गशिक्षक शिवाजी दूंडे म्हणाले की, या मेळाव्याच्या अयोजनामुळे इतर माजी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 
या वेळी व्यासपीठावर प्राथमिक शाळेतील माजी शिक्षक गणेश बैरागी, उषा पाचारणे, आशालता भागवत व रयत मधील माजी शिक्षक भगवान पाटोळे, रावसाहेब लोंढे, रामचंद्र माळी, शिवाजी वाघमारे,  शहाजी लांडगे, शिवाजी, तुकाराम फाळके, लक्ष्मण रोडे, राजेंद्र पाटील, उदयकुमार सांगळे, महादेव पवार, ज्ञानेश्वर सुर्वे, सुनिल घुमटकर, जलवंती निघोट तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुतार, मुलाणी, चासकर उपस्थित होते. या सर्वांचा श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख पंचवीस हजारांची देणगी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दिली होती या वेळीही प्राथमिक शाळेसाठी सांस्कृतिक सभा मंडप व माध्यमिक शाळेसाठी सुसज्ज पाण्याची टाकी बांधून देण्याचे जाहीर केले. या वेळी संतोष जाधव,  संदिप गायकवाड, सचिन कालेकर, सुभाष नेटके, सचिन गोरडे, सोमेश्वर वाफगावकर, पांडुरंग सुतार, संतोष सोनवणे, धनश्री नारगोलकर, विनायक शिंदे, सतिश  टाकळकर, अजय  रोकडे, दशरथ गार्डी, सोपान कांबळे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  प्रस्ताविक सीमा तांबे यांनी केले. सुत्रसंचालन विजय कराळे यांनी तर अभार मनिषा कांबळे यांनी मानले.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

धक्कादायक : देवगाव येथील घोडनदी पात्रात महिलेचा मृतदेह

समर्थ भारत वृत्तसेवा लाखणगाव (विजय कानसकर) ता. २७ : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आज सकाळी ९:३० च्या सुमारास मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तींना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. त्यांनी सदर घटना तातडीने देवगावच्या सरपंच दिपाली खांडगे व उपसरपंच दिलीप दाभाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पारगाव पोलीस ठाण्यात कळविले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सदर अज्ञात महिला पिंपरखेड (ता. शिरूर) येथील असल्याचे समजले. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृत देहाची ओळख पटविण्यात आली.