Skip to main content

अवघ्या सहा तासांत खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. ए पी आय राहुल लाड यांची धडक कारवाई.

मंचर येथे एकाचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक



मंचर (गांजाळेमळा )येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह गांजाळेमळा येथील विहिरीत आढळला होता  या घटनेची माहिती मिळतात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता मात्र या विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा घराच्या जागेच्या  वादातून खून झाला असल्याचे समोर आले आहे याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांजाळेमळा येथील एका विहिरीत नवनाथ धोंडीभाऊ गांजाळे (वय वर्ष ४२ राहणार गांजळेवस्ती मंचर) याचा मृतदेह सापडला होता. तो काही दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात सोमवार दि १७ रोजी त्याच्या कुटूंबियांनी दाखल केली होती.त्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही .व दि १८ रोजी त्याचा मृतदेह वाडीतील विहिरीत आढळून आला त्यानंतर मंचर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर त्याच्या कुटूंबियांना कळले की मयत नवनाथ गांजाळे यांचा घराच्या जागेवरून दि ,१६ रोजी वाडीतीलच सचिन एकनाथ गांजाळे,(राहणार गांजाळेमळा)व त्याचा मित्र विनोद केरभाऊ तांबडे (राहणार तांबडेमळा,अवसरी)याच्याशी वाद झाला होता या वादावरून नवनाथ ला त्या दोघांनी दगडाने मारहाण करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला विहिरीत टाकण्यात आले होते.ही माहिती कळताच मयत नवनाथ गांजाळे यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी करून  सचिन गांजाळे, विनोद तांबडे यांना अटक केली आहे याबाबत अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहे.


 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.