Skip to main content

देशातल्या षडयंत्रापासून आपण अनभिज्ञ कसे - अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर

आपण शिकलो सवरलो, पण बुद्धीजीवी नाही बानू शकलो. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.



औरंगाबाद : आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो. देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत. आपण वर्तमानात जगत नाही. वर्तमानातूनच भविष्य बनत असते. भविष्यातून वर्तमान घडत नाही, असे मौलिक विचार शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले. 


बीड बायपास रोडवरील वासंती मंगल कार्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या बामसेफच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. 'सामाजिक परिवर्तन फुले-आंबेडकरी मिशनसे, या दिशाहीन आंदोलनसे?' असा या सत्राचा विषय होता. सकाळी पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पहिले सत्र सुरू झाले. 


भन्ते खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.देशाला व संविधानालाही वाचवावयाचे आहे. कारण संविधान संपुष्टात आणण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे. याविरुद्धची लढाई प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन भदन्त खेमधम्मो यांनी केले, तर पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांनी, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राबाहेर पडावे, उत्तर प्रदेश त्यांची वाट पाहत आहे, असे साकडे घातले. 


अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची एनआरसी व सीएएबद्दलची रोखठोक भूमिका समोर आलेली आहे. आजही ते या मुद्यावर पोटतिडकीने बोलत होते. एनआरसी कायदा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. उपस्थितांमधून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. फक्त दोन-तीन जणांनी हात वर केले. हे पाहून प्रकाश आंबेडकर  अवाक् झाले. मग हे अधिवेशन कशासाठी? इतिहासात रममाण होण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी, बामसेफच्या कॅडर कॅम्पमधून नेते का तयार होत नाहीत, असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित करून सर्वांना विचार करायला भाग पाडले.


प्रारंभी, नेहा राव, सत्यप्रकाश बौद्ध व डॉ. जितेंद्र बौद्ध यांनी क्रांतिगीते गायिली. के. बी. दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अतरवीरसिंह यांचेही यावेळी भाषण झाले.


दरम्यान बामसेफ च्या मंचावर आंबेडकर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.बामसेफच्या मंचावर प्रकाश आंबेडकर कसे, अशी चर्चा आजही होत होती. यासंदर्भात बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. बी. दिवेकर यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीही बामसेफच्या मंचावर आंबेडकरांना आणले होते व ते आले होते. बामसेफचे अन्य गट प्रकाश आंबडेकर व भिक्खू संघालाही मानत नाहीत. आम्ही या दोघांनाही मानतो. त्यामुळे बामसेफच्या मंचावर आंबेडकरांचे येणे यात गैर काहीच नाही. 


पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.